नमस्कार,
मराठी ब्लॉग विश्व ह्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे तसेच त्यांच्या अनुदिनीकारांना एकत्र आणणे हे “मराठी ब्लॉग विश्व” ह्या संकेतस्थळाचे मूळ प्रयोजन आहे.
ह्या संकेतस्थळांवरील स्वयंचलित (crawler) कार्यक्रम वेगवेगळ्या मराठी ब्लॉगांवरील नवनवीन लेखांचे आकलन करून ह्या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर प्रकाशित करतात. त्याबरोबर नवीन मराठी ब्लॉगांना शोधणे आणि त्यांची कडी यथील मराठी ब्लॉग शृंखलेमध्ये जोडणे हे कार्यसुद्धा नियमितपणे ह्या संकेतस्थळावर होते. तुम्हाला नवीन मराठी ब्लॉग शोधत राहाण्याची गरज नको कारण नवीन मराठी ब्लॉग शोधत राहाणे हेच ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर नवा मराठी ब्लॉग सुरू केलात अथवा इतर कुठला सुंदर मराठी ब्लॉग तुम्हाला गवसला तर त्याबद्दल आम्हाला जरूर कळवा.
आंतरजाल (इंटरनेट-the Internet) च्या उगमामुळे साध्य झालेले “ब्लॉग” किंवा नोंदस्थळ हे माध्यम आज जोमाने वाढत आहे. व्यक्तिगत विचार, लेख आणि काव्य मोठ्या जनसमुदायाला अगदी सहजपणे उपलब्ध करण्यासाठी “ब्लॉग” ह्या माध्यमाची शक्ती अगोदरच सिद्ध झाली आहे . ह्या माध्यमाचा उपयोग करून आजतागायत बर्याच मराठी ब्लॉगांचा किंवा नोंदस्थळांचा उगम झाला आहे. दर महिन्याला मराठीमध्ये लिहिल्या जाणार्या ब्लॉगांच्या संख्येत वृद्धी होत आहे. इंटरनेटवरील दर्जेदार मराठी लेखांप्रमाणेच त्यांच्या वाचकांत सुद्धा वाढ होत आहे. मराठी वाचकांना त्यांना आवडते ब्लॉग शोधण्यात ह्या संकेतस्थळावरील माहितीची बरीच मदत होईल अशी आशा आहे.
ह्या संकेतस्थळाद्वारे मराठी वाचकांना खाली दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारांची माहिती व कार्यक्षमता उपलब्ध आहे:
१) आंतरजालावरील समस्त मराठी ब्लॉगांची सूची आणि अधिक माहिती ह्या एका संकेतस्थळावर मिळविणे.
२) आंतरजालावरील वेगवेगळ्या मराठी ब्लॉगांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नोंदींची माहिती मिळविणे
३) मराठी ब्लॉगांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नोंदींची फीड (R.S.S Feed) ह्या एका ठिकाणी मिळविणे. आम्हाला नवीन ब्लॉग गवसले असता त्या ब्लॉगवरील नोंदी सु्द्धा आपोआप येथील फीड मध्ये प्रसारीत होतील.
४) येथे असलेल्या चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन मराठी ब्लॉग (अनुदिनी) विषयक प्रश्ने विचारणे अथवा चर्चा करणे.
५) मराठी ब्लॉग सुरु करण्याबद्दल उपयुक्त माहिती .
६) सर्वसाधारणपणे मराठी लिखाण आणि संगणकावरील देवनागरी लिपिचा वापर करण्याबद्दल माहिती तसेच थेट मराठी देवनागरी टंकलेखन करणे.
७) आंतरजालावरील समस्त मराठी ब्लॉगांमध्ये प्रसिद्ध झलेल्या नोंदींच्या वर्गीकरणाबद्दल माहिती मिळविणे.
मराठी देवनागरी लिपितील अक्षरे इंटरनेट ब्राउजर सॉफ्टवेअरवर बरोबर कशी दाखवावी ह्याबद्दलची माहिती येथे दर्शविली आहे: Devanagari Font Problem?
ह्या संकेतस्थळाचा उपयोग तुम्हाला कसा करायला आवडेल येथे असलेल्या चर्चासत्रांमधून सांगा.
आपले,
मराठी ब्लॉग विश्व व्यवस्थापन.